मॉडर्न स्ट्रेस मध्ये मन शांत ठेवण्याची Master Key
आजचं जग बघितलं तर सगळं फास्ट आहे—इंटरनेट, करिअर, अपडेट्स, ट्रेण्ड्स. पण एक गोष्ट मात्र स्लो झाली आहे… मनाची शांती.
नेट 5G आहे, पण मन आणि मेंदू मात्र कायम buffering…
सकाळी डोळे उघडल्यापासून रात्री झोपेपर्यंत डोक्यात विचारांची नोटिफिकेशन्स येतच राहतात:
Career set होईल ना?
लोक माझ्याबद्दल काय विचार करत असतील?
सगळ्यांचं आयुष्य perfect दिसतंय, माझंच का नाही?
हे सगळं इतकं वाढतं की कधी कधी आयुष्यच एक mental battlefield ('कुरुक्षेत्र') बनून जातं.
हे युद्ध नवीन नाही… फक्त मैदान बदललं आहे!
कुरुक्षेत्र म्हटलं की आपल्याला आठवतं महाभारताचं युद्ध.
पण खरं युद्ध १८ दिवस चाललं, आणि त्याआधीच एक मोठं युद्ध अर्जुनाच्या मनात सुरू झालं होतं.आज ज्याला आपण anxiety, panic attack, overthinking म्हणतो, अगदी तसंच अर्जुन अनुभवत होता. ५००० वर्षांपूर्वीचा अर्जुन आणि आजचा तरुण - दोघांमध्ये फारसा फरक नाही. फरक फक्त एवढाच - अर्जुनासमोर नातेवाईक उभे होते, आणि आपल्यासमोर उभं आहे - career pressure, deadlines, EMI, social media comparison आणि future fear. तेव्हा अर्जुनाचं अर्जुनाचं गांडीव धनुष्य गळून पडलं होतं, आज बऱ्याचदा आपल्याआत्मविश्वास कोलमडून पडतो. कधीकधी आपल्यालाही वाटतं की, "बास.... आता पुरे, मला हे जमणार नाही."
फरक फक्त एवढाच अर्जुनासमोर नातेवाईक उभे होते, आणि आपल्यासमोर उभं आहे career pressure, deadlines, EMI, social media comparison आणि future fear.
तेव्हा अर्जुनाचं अर्जुनाचं गांडीव धनुष्य गळून पडलं होतं, आज बऱ्याचदा आपल्याआत्मविश्वास कोलमडून पडतो.
कधीकधी आपल्यालाही वाटतं की, "बास.... आता पुरे, मला हे जमणार नाही."
बाहेरचं युद्ध जिंकायचं असेल, तर आधी मन शांत हवं
महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा
जोपर्यंत मन गोंधळलेलं आहे, तोपर्यंत आपल्याला problem-solving mode मध्ये जाता येत नाही.
म्हणूनच श्रीकृष्ण अर्जुनाला आधी 'मानसशास्त्र' शिकवतो आणि मग ‘युद्धशास्त्र’.
श्रीकृष्णाने अर्जुनाला शांत राहण्यासाठी दिलेली सगळ्यात heavy master key म्हणजे 'स्थितप्रज्ञता' म्हणजेच Emotional Intelligence.
आता 'स्थितप्रज्ञ' होणं म्हणजे नेमकं काय?
Gen Z भाषेत सांगायचं तर -
समजा तुम्ही Instagram वर पोस्ट टाकली, आणि अपेक्षेपेक्षा कमी likes आले…
मूड खराब झाला? स्वतःवर doubt आला?
जर हो, तर तुमची शांती अजूनही दुसऱ्याच्या एका क्लिकवर अवलंबून आहे.
स्थितप्रज्ञ म्हणजे काय?
स्वतःचा remote control स्वतःकडे ठेवणं.
म्हणजे praise मिळालं तरी over-excited नाही.
criticism आलं तरी completely break down नाही.
Emotionless व्हायचं नाही, पण emotions चे गुलाम (slave) पण व्हायचं नाही.
स्थितप्रज्ञ होणे म्हणजे भावनाशून्य होणे नव्हे. याचा अर्थ असा की, बाहेर कितीही वादळ असले तरी तुमच्या मनाचे center (केंद्र) स्थिर असावे.
ऑफिसमधला एक email,
एक message,
एक comment जर तुमची झोप उडवत असेल
तर तुम्ही unknowingly तुमचा mental peace (मनाची शांतता) तुम्ही फार स्वस्तात विकत आहात.
it's priceless तिला तशीच ठेवा.
तुम्ही दुसऱ्याच्या हातात दिलेली तुमच्या मनाची Master Key पुन्हा स्वतःकडे घेणे म्हणजेच 'स्थितप्रज्ञता' Emotional Intelligence.
“मी” आणि “माझे Problems” – दोन्ही वेगळे आहेत
सांख्य योग / सांख्य दर्शन एक powerful concept सांगतं
प्रकृती (Changing Stuff)
शरीर, विचार, भावना, परिस्थिती
हे सगळं बदलत राहतं.
पुरुष (You – the Observer)
जो हे सगळं पाहतो
पण स्वतः बदलत नाही
Simple trick:
जेव्हा तुम्हाला ताण येतो, तेव्हा स्वतःला सांगा "मला ताण आला आहे, पण 'मी' म्हणजे तो ताण नाही." ही छोटीशी जाणीव तुम्हाला त्या परिस्थितीपासून अलिप्त (Detach) करते आणि तिथेच तुमच्या मनाचा control परत मिळतो.
सतत ‘scroll’ करणं म्हणजे सावधपण गमावणं
समर्थ रामदास स्वामी एकच गोष्ट सांगतात
“सावध रहा”
आज आपण इतके auto-mode वर जगतो की, रील बघता बघता १ तास कधी जातो कळतच नाही.
हे freedom नाही, ही इंद्रियांची गुलामी आहे.
Try this:
रोज किमान १ तास Digital Fast
मोबाईल बंद.
Notifications off.
फक्त तुम्ही आणि तुमचं मन.
जो स्वतः शांतपणे बसू शकत नाही, स्वतःशी connect होऊ शकत नाही,
तो जगाशी कधीच नीट connect होऊ शकत नाही.
हे नक्की करुन बघा:
10–15 मिनिटांचा Mental Detox (Practical & Easy)
1 साक्षी ध्यान (5 मिनिटं)
डोळे मिटा.
मनात येणाऱ्या विचारांना थांबवायचा प्रयत्न करू नका.
फक्त त्यांना येताना-जाता बघा.
कल्पना करा कि, तुम्ही रस्ता आहात, आणि तुमच्या मनात येणारे विचार म्हणजे गाड्या
साक्षीभावाने (observer) फक्त बघत राहा.
2 भ्रामरी प्राणायाम
Stress आला की, डोळे मिटा आणि भुंग्यासारखा (भ्रमर) “mmm…” आवाज करा.
हे nervous system साठी natural reset button आहे.
3 झोपण्याआधी Digital Goodbye
झोपण्याआधी 30 मिनिटं मोबाईलला “Good night” म्हणा.
एखादा श्लोक म्हणा,ओंकार घ्या, किंवा डायरीत मनातलं लिहा.
तुमचं मन तुमच्याशी बोलायला तयार असतं फक्त ऐकायला वेळ द्या.
शेवटची पण महत्वाची गोष्ट:
मन शांत करणं म्हणजे विचार बंद करणं नाही.
तर प्रत्येक विचाराला त्याची योग्य जागा करुन देणं आहे.
Mental health म्हणजे overnight miracle नाही.
तो रोजचा छोटा सराव आहे.
एक पाऊल आज,
एक पाऊल उद्या-
आणि मग हळूहळू मनाचं 'कुरुक्षेत्र' शांत होतं.
आता सांगा-
तुमचं मन सध्या अर्जुनासारखं गोंधळलेलं आहे, की तुमच्या रथाचा लगाम हातात घ्यायला तुम्ही तयार आहात?
कंमेंट मध्ये नक्की share करा.
कारण मनाविषयी बोलणं हीच खरी strength आहे.
© श्रीपल्लवी
अभ्यासक – भारतीय मानसशास्त्र
